Latest

Delhi : दिल्लीतील ‘औरंगजेब लेन’च्या नावात बदल; आता ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन’ असे नामांतरण

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राज्यात औरंगजेबावरून राजकीय वातावरण तापले आहे. राजधानीत देखील आता औरंगजेबाच्या नावावरून चर्चा रंगली आहे. नवीन दिल्ली नगरपरिषदेने (एनडीएमसी) दिल्लीतील 'औरंगजेब लेन'चे नाव बदलून आता 'डॉ.एपीजे अब्दुल कलाम लेन' असे केले आहे. लोकभावनेचा सन्मान करीत महापुरूषांना तसेच महिलांना ओळख देण्यासाठी लेनच्या नावात बदल करण्यात आल्याची माहिती एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी दिली.

मध्य दिल्लीतील या 'लेन'चे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला एनडीएमसी सदस्यांनी मंजूरी दिली आहे. 'औरंगजेब लेन' मध्य दिल्लीतील अब्दुल कलाम रोडला पृथ्वीराज रोडसोबत जोडतो. दिल्ली नगरपालिका कायदा, १९९४ नूसार एनडीएमसी अंतर्गत येणाऱ्या या लेनचे नाव बदलण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये एनडीएमसीने औरंगजेब रोडचे नाव बदलून 'डॉ.एपीजे अब्दुल कलाम रोड' असे नामकरण केले होते. आता लेनचे नाव देखील बदलण्यात आले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT