Latest

चांद्रयान सुरक्षित उतरावे यासाठी श्री खंडोबा देवाला साकडे

अमृता चौगुले

जेजुरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: आज सायंकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरत आहे. हे यान सुरक्षितपणे चंद्रावर उतरावे यासाठी जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थान, ग्रामस्थ, पुजारी सेवक वर्गाच्या वतीने कुलदैवत श्री खंडोबा देवाला दुग्धाभिषेक करून भंडारा उधळत प्रार्थना करण्यात आली.

भारताचे चांद्रयान सुरक्षितपणे चंद्रावर उतरावे यासाठी संपूर्ण भारतात विविध प्रकारे धार्मिक उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मंदिरात देवसंस्थान, ग्रामस्थ व पुजारी सेवक वर्गाच्या वतीने दुपारी दुग्धाभिशेक, पूजा करून भंडारा उधळत देवाला प्रार्थना करण्यात आली. यावेळी देवसंस्थानचे विश्वस्त अनिल सौदडे, आधिकारी बाळासाहेब खोमणे, पुजारी सेवक वर्गाचे गणेश आगलावे तसेच महेश शिंदे,पुजारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT