Latest

Chandrayaan 3: चांद्रयान -३ मोहिमेसंदर्भात इस्त्रोची मोठी घोषणा; या तारखेला होणार प्रक्षेपण

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने मिशन चांद्रयान-३ संदर्भात आज (दि.०३ जून) मोठी घोषणा केली आहे. चांद्रयान-३ मोहिमेसाठी आम्ही तयारीत असून, या महिन्यात १३ ते १९ जुलै दरम्यान या मोहिमेचे प्रक्षेपण (Chandrayaan 3) करण्यात येणार आहे. अशी माहिती भारतीय अंतराळ संस्थेचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

इस्त्रोचे एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे की, आता आम्ही चंद्रावर सॉफ्टलँडिंग करण्यास सक्षम आहे. त्यामुळे १३ जुलै हा चांद्रयान -३ मोहिम प्रक्षेपणासाठी संभाव्य दिवस आहे, परंतु काही कारणास्तव अडचणी निर्माण झाल्यास १९ जुलैपर्यंत प्रक्षेपणाचा कालावधी पुढे जाऊ शकतो, असे देखील इस्रो प्रमुख एस.सोमनाथ (Chandrayaan 3) यांनी जाहीर केले आहे.

यापूर्वी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी चांद्रयान-२ च्या अयशस्वी चाचणी संदर्भात माध्‍यमांशी बोलताना सांगितले की, कोणतेही नवीन काम करत असल्यास त्यामध्ये यश आणि अपयश येत राहते. अपयश येणे हे सामान्य आहे. प्रत्येकवेळी आपण यशस्वी व्हावेच असे नाही; पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातून शिकून आपण पुढे जाणे (Chandrayaan 3) हे महत्त्वाचे आहे.

जेव्हा चुकांमधून काही सूचना केल्या जातात, तेव्हा आम्ही त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे पण तितकेच खरे आहे की, प्रत्येकवेळी केलेल्या सूचना बरोबर असतीलच असे नाही. काहीवेळा अपयश येऊ शकते, याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करणे सोडून दिले पाहिजेत. त्यामुळे आम्ही लवकरच चांद्रयान-३ ची (Mission Chandrayaan-3) मोहिम हाती घेत आहोत, असेही देखील एस. सोमनाथ यांनी स्‍पष्‍ट केले होते.

चांद्रयान-3 मोहिम काय आहे?

चांद्रयान-3 च्या प्रेक्षपणाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून अनेक शास्त्रज्ञ कठोर परिश्रम घेत आहेत. हे अंतराळयान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच व्हेईकल मार्क-III (LVM3) द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 चांद्रयान-2 चा पुढील प्रकल्प आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि तेथील पृष्ठभागाच्या चाचण्या घेईल. त्यात लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT