Latest

चंद्रपूर : खून प्रकरणातील आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

मोहन कारंडे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : पैशाच्या वादातून हत्या करणा-या एका आरोपीला मंगळवारी (दि. १०) अति. सत्र न्यायालयाने आजन्म कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. देवाशीष उर्फ देवा गुरुपद बिश्वास (वय ३२) रा. शांतीनगर बंगाली कॅम्प, चंद्रपुर असे आरोपीचे नाव आहे.

चंद्रपूर येथील शाम नगर रेती बंकर जवळ नितेश नामदेव ठाकरे (वय २८, रा. शाम नगर, चंद्रपूर) आणि आरोपी देवाशीष या दोघांमध्ये पैशाच्या कारणावरुन भांडण झाले होते. यामध्ये देवाशीष याने नितेशच्या डोक्यावर, गळ्यावर, छातीवर व चेहऱ्यावर चाकूने वार केले होते. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नितेशचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली होती. तसेच आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

न्यायालयाने सुनावणी दरम्यान या प्रकरणातील साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे मंगळवारी देवाशीष उर्फ देवा याला आजन्म कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिण्याची शिक्षा अति. सत्र न्यायाधीश २, पी. जी. भोसले यांनी सुनावली आहे. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता, अॅड. आसीफ शेख यांनी काम पाहिले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT