Latest

चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्यात पट्टेदार वाघ जेरबंद; आवळगाव शेतशिवारात घेतला होता महिलेचा बळी

अमृता चौगुले

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : ब्रम्हपूरी तालुक्यात धुमाकूळ घालून दहशत पसरविणाऱ्या एका पट्टेदार वाघला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. ही घटना आवळगाव शेतशिवारात घडली. जेरबंद वाघाला चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रिंटमेंट सेंटर मध्ये हलविण्यात आले आहे. वाघ जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपूरी तालुक्यातील आवळगाव शेतशिवारात मागील काही दिवसांपासून एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला होता. आवळगाव येथील एका महिलेचा बळीही घेतला होता. त्यांनतरही वाघाचे शेतशिवारात शेतकऱ्यांना दर्शन होणे सुरूच होते.

नागरिक, शेतकरी, शेतमजूरांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरीत होती. पट्टेदार वाघामुळे आवळगाव परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोका लक्षात घेता मुख्य वनजिव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी महिनाभरापूर्वीच आदेश दिले होते. तेव्हापासून वनविभागाची त्या पट्टेदार वाघावर पाळत होती.

ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्रातील आवळगाव उपवनक्षेत्र वांद्रा नियतक्षेत्रामध्ये कक्ष क्रमांक 1047 मध्ये पट्टेदार वाघ आढळून आला. यावेळी वाघाच्या मागावर असलेले डॉ. रविकांत खोब्रागडे, सशस्त्र पोलिस अजय मराठे व अन्य वनाधिकाऱ्यांच्या सहाच्या सुमारास वाघाला डार्ट करून बेशुध्द केले. त्यानंतर त्याला साडेसातच्या सुमारास एका पिंजऱ्यात सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT