Latest

चंद्रपूर : अल्पवयीन विद्यार्थींनींसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षक गजाआड

अमृता चौगुले

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : जिवती तालुक्यात ताडी हिरापूर येथे पेपर तपासण्याच्या बहाण्याने प्राथमिक शाळेतील वर्ग 4 व 7 वी मधील 7 अल्पवयीन विद्यार्थींनींसोबत शिक्षकाने अश्लिल चाळे केले. तर वर्षभरापासून प्राथमिक शाळेच्या या शिक्षकाचे अश्लिल चाळे सुरू होते. ही बाब धक्कादायक असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी आहे. जिवती पोलिसांनी शिक्षकाला सोमवारी (दि.18) बेड्या ठोकल्या. अच्युत खोबाजी राठोड असे आरोपी शिक्षकाचे नाव असून या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

जिवती तालुक्याच्या ठिकाणापासून 8 कि.मी. अंतरावरील ताडी हिरापूर येथे वर्ग 1 ते वर्ग 7 पर्यंत शाळा आहे. याच शाळेत शिक्षक म्हणून अच्युत खुपभाजी राठोड हे कार्यरत होता. मागील वर्षभरापासून सदर शिक्षकाचा वर्ग 4 व वर्ग 7 मधील अल्पवयीन काही विद्यार्थींनीसोबत चाळे करत होता. सदर विद्यार्थींनींवर अत्याचार प्रकार वाढत असतानाच शिक्षकाकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती विद्यार्थींनींनी आपल्या पालकांना दिली. सोमवारी (दि. 18) पालकांनी जिवती पोलिस ठाण्यात सदर शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली.

अल्पवयीन मुली व पालकांच्या तक्रारीवरून जिवती पोलिस ठाण्यात शिक्षक अच्युत खूपभाजी राठोड याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. सोमवारीच (दि.18) पोक्सो तपास पथकाने या घटनेचा तपास करून सदर शिक्षकाला अटक केली आहे. मंगळवारी (दि.19) आरोपी शिक्षकाला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. आंध्रसिमेवरील आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील आदिवासी अतिदुर्गम भागातील जिवती तालुक्यात घटना उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेतील शिक्षकाच्या कृत्याचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT