Latest

उत्तर-पश्चिम भारतात थंडीच्या लाटेची शक्यता

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात पाच जानेवारीपर्यंत थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने या संदर्भात यलो अलर्ट जाहीर केला आहे. उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश तसेच दिल्लीत थंडी वाढेल, अशी शक्यता वर्तवली आहे.

राजधानी दिल्लीत शनिवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. घनदाट धुके पडल्याने वाहन चालकांना वाहनांची दिवे लावून वाहन चालवावे लागले. दोन जानेवारीपर्यंत दिल्लीतील तापमान ४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पाच जानेवारीपर्यंत हे तापमान कायम राहील. पुढील ३ ते ४ दिवसांपर्यंत दिल्लीसह चंदीगड तसेच हरियाणात घनदाट धुके पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान ६ अंश सेल्सियस तर कमाल तापमान २० अंश सेल्सियसच्या जवळपास नोंदण्यात आले आहे. दिल्लीत त्यामुळे कडाक्याची थंडी पडली होती. बुधवारपासून तापमानात वाढ झाल्याने दिल्लीकरांना थंडीपासून थोडा दिलासा मिळाला होता. आता पुन्हा थंडीच्या लाटेचा तडाखा दिल्लीकरांना सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT