Latest

Mahadev Betting App : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महादेव बेटींग ॲपसह २२ ऑनलाइन ॲपवर बंदीचे आदेश

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने ऑनलाइन बेटिंग ॲपबाबत (Mahadev Betting App) मोठा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने महादेव बुक आणि रेड्डीअण्णा प्रेस्टोप्रोसह २२ बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश आज (दि. ५) देण्यात आले आहेत. बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप सिंडिकेट आणि त्यानंतर छत्तीसगडमधील महादेव बुक ॲपवर टाकलेल्या छाप्यामध्ये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या तपासानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या कारवाईनंतर ॲपचे बेकायदेशीर प्रकरण उघडकीस आले आहे.

ईडीच्या सूचनेनुसार, आयटी मंत्रालयाने आज (दि. ५) महादेव ॲपसह २२ बेकायदेशीर बेटिंग ॲप्लिकेशन्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून MEITY ने महादेव ऑनलाइन ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप आणि वेबसाइट्स विरुद्ध ब्लॉक ऑर्डर जारी केले आहेत. (Mahadev Betting App)

संबंधित बातम्या

छत्तीसगड सरकारकडून बेटींग ॲपवर कारवाईची अपेक्षा

मंत्री राजीव चंद्रशेखर (कौशल्य विकास, उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान) यांनी याबाबत माहिती देत असताना छत्तीसगड सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, "छत्तीसगड सरकारला माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत कोणतीही वेबसाइट/ॲप बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु त्यांनी तसे केले नाही आणि उलट अशा ॲप सुरूच ठेवल्या होत्या. गेल्या दीड वर्षात राज्य सरकारकडून चौकशीबाबतची माहिती किंवा एकही विनंती करण्यात आलेली नाही. छत्तीसगड सरकारने याबाबत कारवाई अथवा चौकशी करण्याविषयीचे पाऊल उचलणे अपेक्षित होते, परंतु याबाबत पहिली विनंती फक्त ईडीकडून प्राप्त झाली आहे." अशी माहिती मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT