Latest

QR codes on medicines | आता ३०० औषधांच्या ब्रँड्सवर असेल QR कोड, लगेच कळणार औषधे खरी की बनावट!

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; आता मोबाईलवर स्कॅन करुन तुम्हाला दिलेली औषधे खरी आहेत की बनावट हे समजणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ३०० ब्रँडच्या औषधांवर क्यूआर कोड आणि बारकोड लावण्याचे (QR codes on medicines) निर्देश जारी केले आहेत. केंद्राने वेदनाशामक, जीवनसत्त्वे, मधुमेह आणि उच्चरक्तदाबाच्या औषधांसह इतर ३०० सामान्य औषधांच्या ब्रँडची सत्यता तपासून पाहण्यासाठी QR कोड व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत या वर्षी जूनमध्ये जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेचा मसुद्याला या महिन्यात अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०२३ पासून ही यंत्रणा लागू होणार आहे. या निर्णयाचा डोलो, अॅलेग्रा, सॅरिडॉन, कोरेक्स आदी औषधांचा ब्रँडवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फार्मास्युटिकल उद्योगाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी १८ महिन्यांचा (अंतिम अधिसूचनेच्या तारखेपासून) वेळ मागितला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषध नियम १९४५ मध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत. गेल्या मार्चमध्ये आरोग्य मंत्रालयाने फार्मास्युटिकल्स विभागाला (DoP) ३०० औषध ब्रँड्सची शॉर्टलिस्ट करण्यास सांगितले होते ज्यात त्यांना QR कोडच्या अंमलबजावणीसाठी समाविष्ट केले जाऊ शकते. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने ३०० औषधांची यादी तयार केली आहे आहे त्यात वेदनाशामक, गर्भनिरोधक, जीवनसत्त्वे, रक्त-शर्करा आणि उच्च रक्तदाब आदी औषधांचा समावेश आहे.

१४ जून रोजी मसुद्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यात मंत्रालयाने असे म्हटले होते की उत्पादकांनी त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंग लेबलवर बार कोड प्रिंट करावा अथवा तो पॅकेज लेबलवर चिकटवावा. त्यात प्रमाणीकरण सुलभ करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनसह वाचनीय डेटा किंवा माहिती संग्रहित करावी. त्यात संग्रहित डेटा अथवा अद्वितीय उत्पादन ओळख कोड, औषधाचे योग्य आणि जेनेरिक नाव, ब्रँड नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, कालबाह्य तारीख आणि उत्पादन परवाना क्रमांक यांचा समावेश असावा, असे सूचित केले होते.

यामुळे बनावट औषधे ओळखता येतील आणि त्यांच्या विक्रीवर बंदी आणता येईल. एखादा का बार कोड आणि क्यूआर कोड औषधांच्या पाकिटावर लावल्यानंतर औषधे खरी आणि आहेत की बनावट हे कळणार आहे. (QR codes on medicines)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT