Latest

Central Railway : मध्य रेल्वेच्या वीस गाड्या रद्द; 3 उशिरा धावणार

backup backup

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा जंक्शन विभागातील पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान या मार्गावरील एकूण 20 गाड्या रद्द केल्या आहेत. 3 गाड्या वेळाने धावणार असून 6 गाड्या अंतिम थांब्यावर पोहोचू शकणार नाहीत. (Central Railway)

Central Railway : रद्द झालेल्या गाड्या

शनिवार, 5 फेब्रुवारी आणि रविवार, 6 फेब्रुवारी रोजी सुटणारी ट्रेन (क्र. 22119) मुंबई सीएमएसटी – करमळी एक्स्प्रेस, 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी सुटणारी ट्रेन (क्र. 22120) मुंबई सीएमएसटी – करमळी एक्स्प्रेस, दि. 5 फेब्रुवारी, 6 आणि 7 रोजी सुटणारी ट्रेन (क्र. 12051 आणि 12052) मुंबई सीएमएसटी – मडगाव जं. एक्स्प्रेस, 7 रोजी सुटणारी ट्रेन (क्र. 11085) लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव जं., 8 रोजी सुटणारी ट्रेन (क्र. 11086)

मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस, 5 रोजी सुटणारी ट्रेन (क्र. 11099) लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव जं. , 6 रोजी सुटणारी ट्रेन (क्र. 11100) मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस, 5 रोजी सुटणारी ट्रेन (क्र 22113) लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली, 7 रोजीची ट्रेन (क्र. 22114) कोचुवेली -लोकमान्य टिळक.

6 फेब्रुवारीची ट्रेन (क्र. 12224) एर्नाकुलम जं. – लोकमान्य टिळक (टी), 5 आणि 8 फेब्रुवारीची ट्रेन (क्र. 12223 ) लोकमान्य टिळक (टी) – एर्नाकुलम जं., 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान सुटणारी ट्रेन ( क्र. 12133) मुंबई सीएसएमटी – मंगळुरु जं. आणि ट्रेन (क्र. 12134) मंगळुरु जं. – मुंबई , 7 आणि 8 फेब्रुवारीची ट्रेन (क्र. 11003) दादर – सावंतवाडी आणि ट्रेन (क्र. 11004) सावंतवाडी रोड – दादर. 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान सुटणारी ट्रेन (क्र. 50103) दिवा – रत्नागिरी पॅसेंजर आणि ट्रेन (क्र.50104) रत्नागिरी – दिवा पॅसेंजर , 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान सुटणारी ट्रेन (क्र. 10106) सावंतवाडी रोड – दिवा आणि ट्रेन (क्र. 10105 ) दिवा – सावंतवाडी रोड.

आंगणेवाडी, होळीसाठी कोकण रेल्वेच्या स्पेशल ट्रेन

आंगणेवाडीची जत्रा आणि होळी सणानिमित्त कोकणात जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी ते सावंतवाडी आणि दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान या स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहेत.

01161 लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्पेशल ट्रेन 23 फेब्रुवारी रोजी रात्री 11वाजून 45 मिनिटांनी सुटून दुसर्‍या दिवशी
सकाळी 10 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे.01162 सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन 24 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी एलटीटीला पोहोचणार आहे.

01163 दादर ते सावंतवाडी रोड ट्रेन 16 ते 19 मार्ट दरम्यान दररोज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता 01164 ट्रेन याचा कालावधीत दररोज रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी निघून दुसर्‍या दिवशी सकाळी 11वाजून 10 मिनिटांनी दादरला पोहोचेल.

या दोन्ही स्पेशल गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा दिला आहे. प्रवासी या गाड्यांचे आरक्षण शनिवार, 5 फेब्रुवारीपासून करु शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT