पन्हाळा : लाईट अँड साउंड शो उभारण्यासाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी

पन्हाळा : लाईट अँड साउंड शो उभारण्यासाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी
Published on
Updated on

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : किल्ले पन्हाळगडाच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्य शासनाने बारा कोटी रुपयांच्या निधीस आज प्रशासकीय मंजुरी दिली आहे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या महाराष्ट्र राज्याला आकर्षण ठरेल अशा प्रोजेक्टला विशेष मंजुरी दिली असल्याने पर्यटनस्थळ व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पन्हाळ्याला आता या नवीन उपक्रमा मुळे नवी ओळख प्राप्त होणार आहे अशी माहिती पन्हाळ्याच्या माजी नगराध्यक्ष रुपाली धडेल यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

गेली दोन-तीन वर्ष पन्हाळगडावर इतिहासाला उजाळा देण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीने लाईट अँड साऊंड शो खास पर्यटकांसाठी उभारण्यात येणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी जाहीर केले होते. त्यादृष्टीने सातत्याने शासनाची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पन्हाळ्याचा इतिहास पर्यटक व नव्या पिढीसमोर लाईट अँड साऊंड शो च्या माध्यमातून ठेवण्यासाठी राज्य शासनाची परवानगी मिळाली होती. यासाठी 12 कोटी रुपयांची निधीस आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पैकी पहिल्या टप्प्यात तीन कोटी रुपये हे काम सुरू करण्यासाठी मिळणार आहेत अशी माहिती सौ रुपाली धडेल यांनी दिली, पन्हाळागडावर लाईट अँड साऊंड शो पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून पन्हाळा येथील इंटर प्रीटीशन सेंटर येथे हा शो पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या शो ची निर्मिती केली जाणार आहे असेही सौ धडेल यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून निधी नसल्यामुळे प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पाला मंजुरी मिळावी व निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद मार्फत प्रस्तावित करण्यात आलेल्या लाईट अँड साउंड शो प्रकल्पास गेले 2 वर्ष कोव्हिड मुळे निधी प्राप्त होत नव्हता.

पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले असून शासनाकडून रु 12 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळा गडावरील ऐतिहासिक घटनांवर आधारित लाईट अँड साउंड शो चे 13 D इफेक्ट्स असलेला प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास फक्त पन्हाळा हे फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रमुख पर्यटन केंद्र बनण्यास मदत होणार आहे. असेही नगराध्यक्षा सौ रुपाली रवींद्र धडेल यांनी सांगितले. व सदर प्रकल्प मंजूर केल्याबद्दल राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. सदर प्रकल्पास निधी मंजूर झाल्यामुळे पन्हाळा शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच प्रकल्प यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news