Latest

Maha Baahubali Samosa : बर्थडेसाठी केक नाही, तब्‍बल १७ किलोचा समोसा; वडिलांच्‍या वाढदिनी मुलांचे अनोखे सेलिब्रेशन

Arun Patil

जयपूर : वाढदिवसाला केक कापणे ही काही नवलाईची बाब नाही; पण हल्ली त्यामध्येही अनेक भन्नाट प्रकार केले जातात. व्यक्ती जितकी वर्षे वयाची असेल तितक्या किलोंचाही केक कापला जात असतो. मात्र, वाढदिवसाला कुणी समोसा कापल्याचे ऐकिवात होते का? राजस्थानच्या बाडनेरमध्ये अशा वाढदिवसाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. वडिलांचा 50 वा वाढदिवस मुलांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. या वाढदिवसावेळी केकऐवजी साडे 17 किलोचा समोसा ( Maha Baahubali Samosa )  कापण्यात आला आहे.

Maha Baahubali Samosa : वडिलांना दिले सरप्राईज गिफ्ट

 या खास समोसाला 'महा-बाहुबली समोसा' असे नाव देण्यात आले आहे. 150 हून अधिक लोकांनी हा समोसा खाल्ला. हा बाहुबली समोसा बनवायला4 तास लागले आणि त्यात इतके साहित्य होते की तेवढ्यात 80 ते 90 साधे समोसे बनले असते. काही दिवसांपूर्वी मुलांनी यू ट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला होता. त्यात 10 किलोंचा समोसा दाखवला होता. यावर बाडमेरच्या सचिन आणि भरत या दोन भावांनीही आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी नवीन आणि अनोखे करण्याचा विचार केला. त्यांना वडिलांना सरप्राईज गिफ्ट द्यायचे होते. दोन्ही भावांनी बालोत्रा शहरातील मिठाई बनवणार्‍याशी संपर्क साधला.  त्याने १७ किलोचा सामोसा तयार करण्‍यास होकार दिला. सोमवारी 17.5 किलो समोसा तयार केला आणि वडील हिरालाल प्रजापत यांना महा-बाहुबली समोसाची अनोखी भेट दिली.

समोसा तळायला लागला तब्‍बल दीड तास !

दुकानदार चेलाराम यांनी सांगितले की, "ऑर्डर मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून कारागीर तयार झाले. समोसा आणि त्याचा मसाला तयार करण्यासाठी सुमारे तीन तास लागले. चार कारागिरांनी मिळून तो तयार केले. यानंतर 5 ते 6 जणांनी तो उचलून कढईत टाकला. एवढा मोठा समोसा तळायला दीड तास लागला. यामध्ये बटाट्यांसोबत सुका मेवा, पनीर आदींचाही समावेश होता. हा समोसा बनवण्यासाठी १५ किलोंपेक्षा अधिक पीठ, 5 किलो बटाटे, 1.5 किलो मटार, अर्ध्या किलोपेक्षा अधिक पनीर व अर्ध्या किलोपेक्षा अधिक सुका मेवा वापरण्यात आला."

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT