Latest

इंद्राणी मुखर्जीच्या जामीन अर्जास सीबीआयचा विरोध

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या  (Indrani Mukherjee) जामीन अर्जास सीबीआयने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात विरोध केला. आपल्या स्वतः च्या मुलीला इंद्राणीने कट रचून ठार मारलेले आहे, शिवाय स्वतःच्या मुलाला ठार मारल्याचा कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा महिलेला दया दाखवून जामीन देण्याची आवश्यकता नाही, असे सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukherjee) ही प्रभावशील व्यक्ती आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील साक्षीदारांची अद्याप उलटतपासणी झालेली नाही. अशावेळी बाहेर सोडण्यात आले तर ती साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकते. शिवाय पुराव्यांशी छेडछाड करू शकते, असा युक्तिवादही सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. इंद्राणी ही विश्वास टाकण्यायोग्य नसल्याने जामीनवर बाहेर आल्यावर फरारदेखील होऊ शकते, अशी भीतीही सीबीआयने व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का ?  

SCROLL FOR NEXT