Latest

धक्कादायक ! दिवसात ‘पोक्सो’चे तीन गुन्हे ; अल्पवयीन मुलींना फूस लावून शारीरिक संबंध

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे प्रकार उघडकीस आले असून, एकाच दिवशी पोक्सोअंतर्गत 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील दोघांना खडक व स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, तिन्ही गुन्ह्यांत अल्पवयीन मुली गरोदर राहिल्या. एका 15 वर्षीय मुलीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी हा फिर्यादीचा नातेवाईक आहे. त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर ऑगस्ट 2022 ते मार्च 2023 दरम्यान शारीरिक संबंध ठेवले. ही मुलगी 8 महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे.

गणेश पेठेत राहणार्‍या एका 17 वर्षीय मुलीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख होती. त्यातून फिर्यादीच्या घरी कोणी नसताना एप्रिल महिन्यात तो तिच्या घरी आला. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. महंमदवाडी येथे राहणार्‍या एका महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 20 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या 15 वर्षीय बहिणीस आरोपीने वेळोवळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT