Latest

मुंबई-गोवा महामार्गावर लोटे येथे भीषण अपघात; कारची कंटेनरला धडक, ४ जण जखमी

निलेश पोतदार

खेड : पुढारी वृत्‍तसेवा मुंबई-गोवा राष्‍ट्रीय महामार्गावर आज (मंगळवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहत परिसरात भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वागनोर मोटारीने विनती कंपनी समोर रस्त्यावर उभ्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात .मोटारीतून प्रवास करणारे चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

मोटार चालक गंभीर जखमी असून, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. लोटे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रूग्‍णालयात दाखल केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT