Latest

मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे !

अमृता चौगुले

शेवगाव तालुका  : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आखतवाडे शिवारात छापा टाकून पोलिस पथकाने मोसंबीच्या बागेतील 5 लाख 65 हजार रूपयांची 113 किलो वजनाची 129 गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. आखतवाडे शिवारात बोरलवण वस्तीवर गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती खबर्‍यामार्फत मिळाल्याने शेवगावचे परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, आशिष शेळके, उमेश गायकवाड, सुजित सरोदे, सुनील रत्नपारखी, सचिन खेडकर, एकनाथ गर्कळ, वैभव काळे, रूपाली कलोर यांच्या पथकाने शनिवारी (दि.8) दुपारी 2.30 वाजता तेथील गट नं. 156 क्षेत्रात छापा टाकला. तेथे मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी 5 हजार रूपये प्रति किलोप्रमाणे 5 लाख 65 हजार रूपयांची 113 किलो वजनाची 129 गांजाची झाडे जप्त केली. अरूण बाजीराव आठरे यास अटक केली. हवालदार परशुराम नाकाडे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. दरम्यान, 9 मे रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बाडगव्हाण येथे छापा टाकून मकाच्या पिकात 50 किलो 100 ग्रॅम वजनाची 2 लाख 50 हजार 500 रूपये किंमतीची 335 गांजाची झाडे जप्त करून अशोक सुदाम काजळे यास अटक केली होती. त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT