पुढारी ऑनलाईन डेस्क : फळांचा राजा असे बिरुद मिरविणारा आंबा कोणाला आवडत नाही. वृद्ध असो की लहान मुले आंबा प्रत्येक जण आवडीने खाताे. या फळामध्ये शरीरासाठी आवश्यक असे अनेक पोषक घटक असतात. ( Mango and Diabetic ) आंब्यातील गोडव्यामुळे मधूमेह (डायबिटीज ) झालेल्या रुग्णांना आंबा खाताना मर्यादा येतात का, याबाबत तज्ज्ञ काय सांगतात या विषयी जाणून घेवूया…
आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या देशात लाखो लोक टाइप 2 डायबिटीजने त्रस्त आहेत. बहुतांश डायबिटीज रुग्णांना त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करावे लागते. त्यामुळे त्यांना फळे खाण्यापासून परावृत्त केले जाते.उन्हाळी हंगामात आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. मात्र की साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे डायबिटीज रुग्ण आंबा खाऊ शकत नाही, असाच समज असतो.
डायबिटीज रुग्णांनी आंबा खावा का, याबाबत इंडिया टूडेशी बोलताना मधुमेहतज्ज्ञ डॉ. पुलेला श्रीकर कृष्णा यांनी सांगितले की, कमी प्रमाणात आंबा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात असलेले डायबिटीज रुग्ण आंबा खाऊ शकतात. आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असले तरी त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाणही कमी असते,"
आंब्यामध्ये व्हिटॅमिन ई, के आणि बी कॉम्प्लेक्स लक्षणीय प्रमाणात असते आणि कॅल्शियम, पोटॅशियम आणि तांबे यासह फायबरचे प्रमाण जास्त असते. चयापचय विकारांच्या उपचारात आंब्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. रोज एक आंबा खाल्ल्याने लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल तसेच मधुमेहापासून संरक्षण मिळू शकते, असेही डॉ कृष्णा यांनी सांगितले. मात्र अधिक प्रमाणात आंबा खाल्याने रक्तातील साखरेची पातळी बिघडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा माफक प्रमाणात खावा. त्यांनी त्यांची साखरेची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे. मात्र त्यांनी आंब्याचा रस खाऊ नये आणि फक्त आंबा संपूर्ण फळ म्हणून खावा. कच्चा आंबा दही किंवा भातासोबत खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. इतर उन्हाळी फळे जी मधुमेहाचे रुग्ण नियमितपणे खाऊ शकतात त्यात पेरू, पपई, किवी, जांभूळ आदी फळांचा समावेश होतो, असेही तज्ज्ञ सांगतात.
हेही वाचा :