Latest

Cabinet reshuffle in Odisha | ओडिशात राजकीय भूकंप, सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे, उद्या नवीन मंत्री घेणार शपथ

दीपक दि. भांदिगरे

भुवनेश्वर; पुढारी ऑनलाईन

ओडिशातील मंत्रिमंडळात मोठा फेरबदल (Cabinet reshuffle in Odisha) करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नवीन मंत्री उद्या दुपारी १२ वाजता शपथ घेणार असल्याचे समजते. ओडिशात पाचव्यांदा सत्तेत असलेल्या सत्ताधारी बिजू जनता दल सरकारने २९ मे २०२२ रोजी तीन वर्षे पूर्ण केली आहेत. त्यासाठी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल केला जात आहे. या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी राज्यातील सर्व मंत्रिमंडळांनी आपले राजीनामे सादर केले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळातील सर्व २० मंत्र्यांनी आपले राजीनामे ओडिशा विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द केले आहेत. उद्या सकाळी १२ वाजता राजभवनच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये नवीन मंत्री शपथ घेणार आहे. प्रदीप आमत आणि लतिका प्रधान यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवीन पटनायक यांच्या सरकारने (Cabinet reshuffle in Odisha) हा निर्णय घेतला असल्याचे समजते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल पक्षाला ११२ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला २३, काँग्रेसला ९ आणि डाव्यांना १ जागेवर समाधान मानावे लागले होते. ओडिशा विधानसभा एकूण १४६ सदस्यांची आहे.

SCROLL FOR NEXT