ओडिशाचे सीएम नवीन पटनायकांची अशीही भूतदया! | पुढारी

ओडिशाचे सीएम नवीन पटनायकांची अशीही भूतदया!

पुढारी ऑनलाईन डेस्क 

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रविवारी एका शासकीय बैठकीत एक निर्णय घेतला त्याची चर्चा देशभर होत आहे. ओडिशामध्ये ५ मे पासून लॉकडाऊन सुरु आहे. या काळात भटकी जनावरे, प्राणी आदी प्राण्यांचे खाण्याचे हाल होत आहेत हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर त्यांनी तातडीने प्राण्यांबाबत निर्णय घेतला. 

ममता दीदींच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी, नवीन चेहरे घेणार मंत्रिपदाची शपथ

नवीन पटनायक यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून भटक्या जनावरांना खाऊ देण्यासाठी ६० लाख रुपये मंजूर केले. राज्यातील ५ महानगरपालिका, ४८ नगरपालिका आणि ६१ महत्वाच्या जागी हा निधी पुरवला जाणार असून त्याचे वाटप स्थानिक स्वयंसेवी संस्था करतील. तत्पूर्वी, राज्यातील अनेक ठिकाणी भटके भटक्या जनावरांची खाण्याची व्यवस्था काही स्थानिक लोक करत होते. मात्र, आता नवीन पटनायक यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यात सर्वत्र जनावरांना खाद्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 व्हॅक्सिन पॉलिसीमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाही! केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र 

भटक्या जनावरांना लॉकडाऊनमध्ये अन्न पाणी मिळालं नाही तर त्यांची तडफड होऊ नये म्हणून स्थानिक स्वयंसेवक आणि शासनाच्या मदतीने हे अन्न प्राण्यांना पोहोचवले जाईल. पाच महानगरपालिकांना रोज २० हजार रुपये यावर खर्च करण्याची मुभा असेल. असे सांगण्यात आले आहे. ओडिशाच्या जनसंपर्क विभागाच्या ट्विटर हॅन्डलवर या संबधीची माहिती देण्यात आली आहे. 

 

Back to top button