Latest

Buzz Aldrin : बझ ऑल्ड्रिन या दुसर्‍या चांद्रविराचा चौथा मधुचंद्र; वयाच्या ९३ व्या वर्षी केले लग्न

अमृता चौगुले

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : नील आर्मस्ट्राँग यांच्यानंतर चंद्रावर पाऊल ठेवणारे दुसरे चांद्रवीर म्हणजे बझ ऑल्ड्रिन. बझ वयाच्या 93 व्या वर्षांचे आहेत आणि ते आता चौथ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढले आहेत. बझ ऑल्ड्रिन यांनी त्यांच्या 93 व्या वाढदिवसाला लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 63 वर्षांच्या डॉ. अँका फॉर यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. (Buzz Aldrin)

लॉस एंजेलिसमध्ये या लग्नाचा एक छोटेखानी समारंभ झाला. अँका यांनी सेंट पीट्सबर्ग विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीत डॉक्टरेट केले आहे. (Buzz Aldrin)

पणतूंनाही आहेत मुले! (Buzz Aldrin)

बझ यांनी यापूर्वी तीन लग्ने केलेली आहेत. जोन अ‍ॅन आर्चरशी त्यांचे पहिले लग्न झाले होते. हे लग्न 1954 ते 1974 टिकले. दोघांना तीन मुले आहेत. यानंतर बझ यांची आणखी दोन लग्ने झाली. बझ यांच्या पणतूंनाही मुले आहेत, हे येथे विशेष!

४० वर्षांपासून मद्यमुक्त

बझ ऑल्ड्रिन 1971 मध्ये नासामधून निवृत्त झाले. नील आर्मस्ट्राँग यांच्यासोबतच्या चांद्रप्रवासानंतर बझ हे पुढे काही काळ नैराश्यात होते. मद्याच्या आहारी गले होते. अल्कोहोलिक नॉनिमस या संस्थेच्या सहवासाने त्यांचे हे व्यसन सुटले. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ ते मद्यमुक्त (सोबर) आहेत.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT