बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी आज (दि.२५) दुपारी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. सोयाबीन व कापसाला भाववाढ मिळावी, आदी मागण्यांसाठी तुपकर यांनी २० नोव्हेंबरला बुलढाणा येथे भव्य एल्गार मोर्चा काढला होता. आपल्या मागण्या शासनाने सात दिवसांत पूर्ण कराव्यात, अन्यथा २९ नोव्हेंबररोजी शेतक-यांना घेऊन मंत्रालय ताब्यात घेण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. Ravikant Tupkar
या अनुषंगाने शहर पोलिसांनी तुपकर यांना आंदोलन न करण्याविषयी नोटीस बजावली होती. परंतु, पोलिसांच्या नोटीशीला आपण जुमानत नसून २९ नोव्हेंबरला मंत्रालयात आंदोलन करण्याचा निर्धार कायम असल्याचे माध्यमांतून सांगितले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रविकांत तुपकर यांना शनिवारी दुपारी अटक करून शहर पोलिस स्टेशनमध्ये आणले. तुपकर यांना पोलिसांनी अटक केल्याची वार्ता समजल्यानंतर पेठ व उदयनगर येथील शेतकरी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून टायर जाळून पोलीस कारवाईचा निषेध केला आहे. Ravikant Tupkar
हेही वाचा