Latest

मायावतींची मोठी घोषणा : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्‍वबळावर लढविण्‍याचा निर्धार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बहुजन समाज पार्टीच्‍या अध्‍यक्षा मायावती यांनी आपल्‍या जन्‍मदिनानिमित्त आज ( दि. १५ ) मोठी घोषणा केली. यावर्षी व पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा व लोकसभा निवडणूक बसपा स्‍वबळावर लढवेल, अशी घोषणा त्‍यंनी केली.  सर्व घोटाळा हा 'ईव्‍हीएम'मुळेच आहे. ईव्‍हीएमवर मतदान रद्‍द करुन बॅलेट पेपरवर ( मतपत्रिकेद्वारे) मतदान घेतले तर सर्व निवडणूक निकालाचे चित्रच पालटेल, असा दावाही त्‍यांनी यावेळी केला.

वाढदिनानिमित्त मायावती यांनी आज बसपाच्‍या मुख्‍यालयात माध्‍यमांशी संवाद साधला. त्‍या म्‍हणाला, "जातीवादी आणि आणि संकुचित शक्ती बसपला सत्तेपासून दूर ठेवण्‍यासाठी प्रयत्‍०नशील आहे. देशात ग्लोबल समिटच्या नावाखाली येणारी ही गुंतवणूक म्हणजे भाजपच्या चुकीच्‍या धोरणांवर पांघरूण घालण्याचे नाटक आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्‍यात याव्‍यात जेव्हा-जेव्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका झाल्या, तेव्हा बसपचा जनाधार वाढला आहे."

आता ओबीसी आरक्षणावरही भाजपने काँग्रेस आणि समाजपवादी पार्टी सारखाच मार्ग अवलंबला आहे. त्यामुळेच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकांवर परिणाम झाला आहे, असेही त्‍यांनी सांगितले. या वेळी मायावती यांनी 'माझ्या आयुष्याचा प्रवास आणि बसपा चळवळीतील माझा संघर्ष' या पुस्‍तकाच्‍या भाग 18 व्‍या आवृत्तीचे प्रकाशनही केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT