Latest

BSF vehicle Accident : जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या वाहनाचा भीषण अपघात; १ जवान शहीद तर ६ जखमी

अमृता चौगुले

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन : जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला (Border Security Force)  घेऊन जाणाऱ्या वाहनाचा (Army vehicle) भीषण अपघात झाला. या अपघातात एक भारतीय जवान (BSF) शहीद झाला असून ६ जवान जखमी झाले आहेत. ही घटना जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात घडली आहे. (BSF vehicle Accident)

ही दुर्घटना केंद्र शासित प्रदेश (Union territory) असेलेल्या जम्मू काश्मीरमधील मनकोट सेक्टर जवळ घडली. जखमी जवानांना सेनेच्या रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. जखमी असणाऱ्या ६ जवानांपैकी ४ जणांची गंभीर रित्या जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

बीएसएफ जवानांना घेऊन जाणारे वाहन (क्र. एचआर39 ए 8662) रस्त्यावरुन घसरले व जवळपास २५० फूट घोल दरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि बीएसएफ तसेच पोलिसांनी बचाव तात्काळ अभियान राबवले. जखमींना जवळील रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. तसेच या अपघातात शहीद झालेल्या जवानाची ओळख पटली असून त्यांचे नाव कॉन्स्टेबल राम चंद्रन असे आहे. हा जवान १५८ बटालियनमध्ये कार्यरत होता.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT