Latest

Quinton de Kock : डी कॉकने केली बांगलादेशची ‘यथेच्छ’ धुलाई

Shambhuraj Pachindre
पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज  बांगलादेशचा सामना द. आफ्रिकाशी होत आहे. सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. द आफ्रिकेच्या डावाची सुरूवात खराब झाली. रीझा १२ आणि व्हॅन दर दुसेन १ धावकरून तंबूत परतले. यानंतर आफ्रिकन संघाची धुरा सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि कर्णधार एडन मार्करम यांनी आपल्या हाती घेत बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. (Quinton de Kock)

३६ धावांवर दोन आफ्रिकेच्या दोन बाद असताना डी कॉक आणि मार्करम यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१धावांची भागीदारी केली. ही भागिदारी अधिक आक्रमक होत असताना सामन्याच्या ३१ व्या बांगलादेशचा गोलंदाज शकीब अल हसनने ही भागीदारी तोडली. त्याने आफ्रिकेचा आक्रमक खेळाडू एडन मार्करमला लिटन दास करवी झेलबाद केले. मार्करमने आपल्या खेळीत ६९ चेंडूमध्ये ६० धावांची खेळी केली. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हेनरिच क्लासेनसोबत डी कॉकने आपली धडाकेबाज खेळी सुरू ठेवली. (Quinton de Kock )

डी कॉकची १७४ धावांची 'तुफानी' खेळी

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात डी कॉकने पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळीचा अवलंब केला होता. त्याने आपल्या खेळीत १४० चेंडूमध्ये १७४ धावांची धुवांधार खेळी केली. यामध्ये त्याने १५ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. तो ४६ व्या षटकामध्‍ये बांगलादेशचा हसन मेहमूदच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारतानाा नसून अहमद करवी झेलबाद झाला.

स्पर्धेत डी कॉकचे तिसरे शतक

बांगलादेशच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना क्विंटन डी कॉकने १०१ चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ४ षटकार लगावले. स्पर्धेत डी कॉकने यापूर्वी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध १०० तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०९ धावांची खेळी केली होती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT