Asian Para Games : बॅडमिंटनमध्‍ये महिला एकेरीत भारताची उपांत्‍य फेरीत धडक

Asian Para Games : बॅडमिंटनमध्‍ये महिला एकेरीत भारताची उपांत्‍य फेरीत धडक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमधील हांगझो येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्स स्‍पर्धेत भारताची पदकांची लयलूट सुरुच आहे. आज भारताने बॅडमिंटनमध्‍ये आपले तिसरे पदक निश्‍चित केले. महिला एकेरीत मानसी जोशीने उपांत्‍यपूर्व फेरीत चीनच्‍या Liu Yuemei चा पराभव करत उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.

बॅडमिंटनमध्‍ये भारताचे आणखी दोन पदके निश्‍चित

आशियाई पॅरा गेम्स स्‍पर्धेत भारताचे  बॅडमिंटनमधील आणखी एक पदक आज ( दि.२४) निश्‍चित झाले. प्रमोद भगत आणि मनीषा रामदास मिश्र दुहेरीच्या SL3-SU5 उपांत्‍यपूर्व फरीत चमकदार कामगिरी करत उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे. मिश्र दुहेरी जोडी प्रमोद भगत/मनीषा रामदास यांनी उपांत्‍यपूर्व फेरीत तैयो इमाई/नोरिको इटो या जोडीचा सरळ गेममध्ये 21-10,22-20 असा पराभव करत भारताचे पदक निश्चित केले.

भारताच्‍या नितेश आजिण तुलासिमाथी जाेडीने दुहेरी उपांत्‍यपूर्व फेरीत चीनच्‍या जोडीचा पराभव केला. या जाेडीने उपांत्‍य फेरीत धडक मारल्‍याने भारताचे बॅडमिंटनमधील पदक निश्‍चित झाले आहे, नितेश कुमार/थुलासिमाथी मुरुगेसन जाेडीने  ?? Jianyuan यांग/Qiuxia Yang चा सरळ गेममध्ये 23-21,21-15 असा पराभव केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news