Latest

Brazil Aircraftcrash : ब्राझीलच्या उत्तर अमेझॉनमध्ये विमान कोसळले, १४ जणांचा मृत्यू

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझीलच्या उत्तरेकडील अॅमेझॉन राज्यात शनिवारी (दि.१७) झालेल्या विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मनौसपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेल्या बारसेलोसमध्ये हा अपघात झाला. मृतांमध्ये अमेरिकन नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. (Brazil Aircraftcrash)

संबंधित बातम्या : 

मनौस एरोटॅक्सी एअरलाइनने विमान अपघाताची पुष्टी केली असून या घटनेची चौकशी करत असल्याचे सांगितले. परंतु मृत्यूबद्दल कोणतीही माहिती स्पष्ट केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार विमान लँड करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. या विमानाने मनौस येथून उड्डाण केले. स्थानिक वेळेनुसार दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. खराब हवामानामुळे विमान कोसळले असावे, लँडिंगच्या वेळी मुसळधार पाऊस पडत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अॅमेझोनास राज्याचे गव्हर्नर विल्सन लिमा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "शनिवारी बार्सेलोस येथे झालेल्या विमान अपघातात १२ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सच्या मृत्यूमुळे खूप दुःख झाले." आमची टीम अत्यावश्यक सहाय्य देण्यासाठी काम करत आहेत. माझ्या संवेदना आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबियांसोबत आणि नातेवाईकांसोबत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT