Latest

ब्राझीलमध्ये दोन शाळेत झालेल्या गोळीबारात ३ ठार, ११ जखमी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ब्राझीलमधील एस्पिरिटो सॅंटो राज्यातील अरक्रूझ येथील  दोन शाळांमध्ये शुक्रवारी एका सशस्त्र बंदुकधारीने केलेल्या गोळीबारात तीनजण ठार तर अकरा गंभीर जखमी झाले आहेत. शाळांवर गोळीबार करणाऱ्या बंदूकधाऱ्याकडे सेमी-ऑटोमॅटिक शस्त्र होते. गोळीबाराचे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार व्हिटोरियापासून 50 मैल उत्तरेस असलेल्या अरक्रूझ या छोट्या शहरातील शाळेत हा गोळीबार झाला. एका बंदुकधारीने ब्राझीलमधील एस्पिरिटो सॅंटो राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि एका खासगी शाळेत गोळीबार केला. त्या व्यक्तीने चेहरा झाकलेला होता. लष्करी पोशाख परिधान केला होता. तो १६ वर्षांच्या आसपास वयाचा असल्याचा संशय आहे.  सुरक्षा पथकांनी हल्लेखोराला पकडले आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी ट्विट करत एस्पिरिटो सॅंटो येथील अराक्रूझ शाळांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल मला दु:ख झाले असल्याचे म्हटले आहे. तर एस्पिरिटो सॅंटोचे सार्वजनिक सुरक्षा सचिव मिर्सिओ सेलेंटे म्हणाले की, त्याला इतरांनी मदत केली होती की हे कृत्य एकट्याने केलं का याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT