Latest

MIvsCSK : चेन्नईचा ब्रावो ठरणार मुंबईच्या ‘या’ फलंदाजांसाठी डोकेदुखी ?

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाचा आयपीएलचा हंगाम मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघासाठी काही खास ठरलेला नाही. मुंबईला सहा सामने खेळून त्यांना एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मुंबई अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहे, तर सहा सामने खेळून चेन्नईला एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. आयपीएल प्रत्येक हंगामात टॉप चारमध्ये असणारे हे बलाढ्य संघ यंदाच्या आयपीएलमध्ये गुणतक्यात तळात आहेत. (MIvsCSK)

आयपीएल २०२२ या हंगामात २१ एप्रिलला पहिल्यांदाच चेन्नई व मुंबई एकमेकांना भिडणार आहेत. मुंबईमधील डी. वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना होणार असून हा हंगामातील ३३ वा सामना आहे. मुंबई आणि चेन्नई संघाला या हंगामात विशेष कामगिरी करता आलेली नाही. हे दोन्हीही संघ विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (MIvsCSK)

या सामन्यादरम्यान चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो धडाकेबाज खेळ दाखवू शकतो. ब्रावो सध्या चांगल्या लयीत आहे. तसेच मुंबईविरुद्ध त्याचे आकडेही उल्लेखनीय आहेत. त्यामुळे ब्रावो मुंबईविरुद्ध गेमचेंजर खेळाडू ठरू शकतो.

ब्रावोने मुंबईविरुद्ध केलेल्या कामगिरीवर नजर टाकल्यास, आपल्याला असे दिसते की. त्याने आतापर्यंत मुंबईचे ३१ गडी बाद केले आहेत. ही कोणत्या ही गोलंदाजाने एका संघाविरुद्ध केलेली तिसरी सर्वश्रेष्ठ गोलंदाजीतील कामगिरी आहे. त्यातही ब्रावो मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, कायरन पोलार्ड आणि ईशान किशन यांच्यासाठी कायम डोकेदुखी ठरला आहे.

चेन्नईकडून खेळताना करताना ब्रावोने मुंबईचा 'बिग मॅन' कायरन पोलार्डला सर्वाधिकवेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्याने पोलार्डला १० वेळा बाद केले आहे. तसेच मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माही ५ वेळा त्याची बाद केले आहे. याशिवाय ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनादेखील त्याने तंबूत धाडले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT