Latest

Brahmastra Leak : ब्रह्मास्त्र ऑनलाईन लिक, थिएटर्स पडले रिकामे?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपट (Brahmastra Leak) ब्रह्मास्त्र रिलीज झाला आहे. अयान मुखर्जीने हा चित्रपट करण्यासाठी १० वर्षे घालवली आहेत. दरम्यान, हा चित्रपट रिलीज होण्याआधी काही तासांत ऑनलाईन लीक झालाय. चित्रपट प्रदर्शित होताच निर्मात्यांसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. वास्तविक, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट काही वेबसाईटवर लीक झाला आहे. (Brahmastra Leak)

स्टार इंडियाने कॉपीराइट उल्लंघनाबाबत दाखल केलेल्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने १८ वेबसाईट्सना 'ब्रह्मास्त्र' स्ट्रीम करण्यापासून रोखले होते. इतकी तयारी करूनही हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होऊ शकतो, यामुळे निर्माते खूप नाराज आहेत.

चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला

४०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा चित्रपट निर्मात्यांना आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाची कथा भारतातील पौराणिक कथेवर आधारित आहे. आधुनिक अवतारात दाखवलेल्या शस्त्रांची ही कथा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात ७५ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट इतर बॉलीवूड चित्रपटांपेक्षा चांगली कामगिरी करू शकतो, असे चित्रपट विश्लेषकांचे म्हणणे आहे. रणबीर आणि आलियाशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात शाहरुख खान कॅमिओमध्ये दिसला आहे.

निर्मात्यांना या चित्रपटाच्या कमाईबाबत जरी आशा असली तरी सोशल मीडियावर याचे निगेटिव्ह रिव्ह्यू पाहायला मिळताहेत. लोकांनी अक्षरश? ट्विटरवर ट्विट करत व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओमध्ये ब्रह्मास्त्र थिएटरमध्ये दाखवला जात आहे आणि अख्खे थिएटर रिकामे पडल्याचे दिसत आहे.

ओटीटीवर रिलीज होणार

रणबीर कपूर-आलिया भट्टचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र' आणि करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण' बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना खूप आनंद होणार आहे. 'ब्रह्मास्त्र' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी करणच्या शो आणि नवीन शोबाबत एक मोठी घोषणाही करण्यात आली आहे.

आलिया रणबीरचा मल्टीस्टार 'ब्रह्मास्त्र' नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट काही काळानंतर डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाईल, असे म्हटले जात आहे. पण, तो कधी रिलीज होईल, त्या तारखेचा खुलासा झाला नाही.

हेदेखील वाचा- 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT