पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकातामधील इंडियन म्युझियममध्ये बॉम्ब असल्याचा धमकीचा ईमेल कोलकाता पोलिसांनी मिळाल्याची माहिती आज (दि.५) समोर आली आहे. दहशतवादी १११ नावाच्या ग्रुपकडून हा मेल मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआने दिले आहे. (Bomb Threat In Indian Museum)
इंडियन म्युझियममध्ये बॉम्बच्या धमकीबाबत एक मेल प्राप्त झाला. यानंतर बॉम्ब तपास पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहे. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, पुढील काही तासांसाठी संग्रहालयात अभ्यागतांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे, असेही कोलकाता पोलिसांनी स्पष्ट केल्याचे वृत्तात म्हटले आहे. (Bomb Threat In Indian Museum)