Latest

ब्रेकअपनंतरही ‘हे’ बॉलिवूड स्टार्स मित्र राहिले, यादीत सलमानचंही नाव

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड स्टार सुष्मिता सेन पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेचा विषय आहे  ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा एक्ससोबत फिरणं. ती एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत नुकतीच डिनर करताना दिसली. तेव्हापासून पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. पण, ते दोघे अजूनही चांगले मित्र आहेत.  याआधीही अनेक बॉलिवूड स्टार्स यांचे नाते संपुष्टात आले आहेत. पण, आजही ते चांगले मित्र आहेत. चला तर पाहूया या यादीत कोणाकोणाचा समावेश आहे?

Akshay Kumar-Shilpa Shetty

अक्षय कुमार- शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्या नात्याबद्दल बॉलिवूडपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे. पण ट्विंकलमुळेअक्षय कुमार शिल्पापासून वेगळा झाला. आज हे दोघे खूप चांगले मित्र आहेत.

सलमान खान-कॅटरिना कैफ

कॅटरिना कैफसोबत सलमान खानचे नाव अनेकदा जोडले गेले आहे. या दोघांच्या लग्नाबाबतही अनेक अफवा पसरल्या. पण, त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी कधी झालेली नाही. इतकं होऊनही आज दोघेही चांगले मित्र आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. सलमानच्या आगामी चित्रपटातही कॅट त्याच्यासोबत दिसणार आहे.

रणबीर कपूर-दीपिका पदुकोण

या दोघांच्या प्रेमकथेची चौफेर चर्चा होती, सर्वांना वाटत होते की ते लग्न करतील; पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोघे वेगळे झाले. आता दीपिका आणि रणबीर चांगले मित्र आहेत.

रणवीर सिंग-अनुष्का शर्मा

विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूडची मोठी स्टार अनुष्का शर्मा एकेकाळी रणवीर सिंगच्या प्रेमात पडली होती. या दोघांच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा होती. पण आजही दोघे खूप चांगले मित्र आहेत.

सलमान खान- संगीता बिजलानी

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या नात्याची एकेकाळी बरीच चर्चा झाली हाेती. त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचल्याचे मानले जात हाेते;  पण नंतर सलमानने माघार घेतली आणि हे नाते संपुष्टात आले. पण आजही हे दोघे चांगले मित्र आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT