Latest

Sunny Leone in Cannes : सनी लिओनीचा कान्समधील ग्लॅमरस लूक व्हायरल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी लिओनी तिच्या फॅशन गेमसाठी ओळखली जाते. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकदार पदार्पण केल्याने सनी लिओनी ( Sunny Leone in Cannes ) चर्चेत आली आहे. सनीच्या आकर्षक फॅशनने कान्सच्या रेड कार्पेटवर पुन्हा एकदा सगळ्यांची मने जिंकली आहेत.

अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'केनेडी' च्या प्रमोशनसाठी कान्समध्ये ( Sunny Leone in Cannes ) सहभागी झाली होती. यावर्षी मिडनाईट स्क्रिनिंगसाठी आदरणीय कान्स ज्युरीने निवडलेला एकमेव भारतीय चित्रपट असण्याचा उल्लेखनीय गौरव बहाल केला आहे.

सनी लिओनीने तिच्या उत्तम फॅशन आणि ग्लॅमरस लूकने कान्समधील सगळ्यांची मन जिंकून घेतली. तिचे क्लासिक ब्लॅक-अँड-व्हाइट कॉम्बिनेशन अफलातून दिसत होते. प्रसिद्ध डिझायनर गेमी मालोउफ (Gemy Maalouf ) यांनी सनी लिओनीचा ब्लॅक ऑफ-शोल्डर क्रॉप टॉप डिझाईन केला आहे.

खास म्हणजे, क्रिस्टीना लिलियाना नोव्हा, पाओला झुरिटा, स्टेफानिया ख्रिश्चन, तान्या घावरी, जोसेफिन स्क्राइव्हर, मासूम मिनावाला, हेली शाह, सोनिया बेन आमेर, क्रिस्टीन क्विन आणि प्रसिद्ध हॉलिवूड आणि बॉलिवूड व्यक्तिमत्त्वांच्या पंक्तीत सनी लिओन सामील झाली. आयकॉनिक डिझाईन्सचे तिने कान्समध्ये प्रदर्शन केले.

मनोरंजनाच्या जगात सनी लिओनीने दमदार भूमिका साकारल्या आहेत. सनीचा 'केनेडी' चित्रपट लवकरच सिनेमा थिअटरमध्ये चाहत्याच्या भेटीस येणार आहे. यामुळे या चित्रपटाची आतुरतेने चाहते वाट पाहत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT