Latest

Salman Khan : पन्नाशी ओलांडलेल्या भाईचा ‘स्वॅग’, नेटकरी म्‍हणाले, ‘कडक पोस्ट भाईजान’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवुडचा भाईजान ​सलमान खान (Salman Khan) याने आपल्या अभिनयासोबत फिटनेसमुळे चाहत्याच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सलमान चाहते कायमच त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. सलमानचा आगामी 'टायगर ३' चित्रपट चर्चेत आहे. याच दरम्यान सध्या सलमानच्या एका शर्टलेस फोटोने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

बॉलिवुड अभिनेता सलमान खानने ( Salman Khan ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोत सलमान अंधारातच हटके स्टाईलमध्ये दिसत आहे. सलमानच्या एका बाजूला छोट्या दिव्याचा हलकासा प्रकाश दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोत सलमानचा माचो लूकमध्ये स्वॅग दिसला आहे. यातील खास म्हणजे, सलमानने वयाच्या ५० वर्षानंतरही स्वत: ला फिट ठेवले असल्याचे दिसून येत आहे. या फोटोच्या कॅप्शममध्ये सलमानने 'Green leaves matter! @beingstrongglobal #BeingStrong' असे लिहिले आहे. सलमानचा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने '????My hero ?', 'टायगर वाला लूक❤️❤️', 'टायगर आ रहा है लोगो को जला ने', 'Aattt??'. तर दुसऱ्या एका युजर्सने 'ना ढूँढ मेरा किरदार दुनियाँ की भीड़ में ,वफ़ादार तो हमेशा तन्हा ही मिलते हैं', 'चलो, अब मेरा गणा सुन लो… आज फिर ??????????? बन गए होंगे तुम ???', 'कडक पोस्ट भाईजान ❤️'  अशा कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

याआधीही सलमानने जिममध्ये वर्कआउट आणि शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत सलमान व्यायाम करताना दिसत आहे. परंतु, सलमान यावेळी पाठमोरा असल्याने त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यावरून सलमान आगामी 'टायगर ३' चित्रपटासाठी मेहनत घेत असल्याचे बोलले जात आहे.

सलमानचा आगामी 'टायगर ३' चित्रपट पुढील वर्षी म्हणजे, २१ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT