कोल्हापूर : गंगावेश तालमीच्या पैलवानांमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढाई | पुढारी

कोल्हापूर : गंगावेश तालमीच्या पैलवानांमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढाई

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ६४ महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गटांमध्ये मुंबई उपनगरचा विशाल बनकर विरुद्ध वाशिमचा सिकंदर शेख यांच्या कडवी लढत झाली. यामध्ये विशाल बनकर याने सिकंदर शेख याच्यावर १३ विरुद्ध १० हा अशा गुणांनी विजय मिळवला. त्यामूळे आता महाराष्ट्र केसरी किताबसाठी गंगावेश तालमीच्या कोल्हापूर पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल बनकर यांच्यात लढत होणार आहे.

लढतीच्या पहिल्या सत्रात विशाल बनकर याने सिकंदर याच्यावर आघाडी राखली त्याने आठ गुण मिळवले तर सिकंदर याला सहा गुण मिळवता आले. दुसऱ्या सत्रात सिकंदर शेख याने आघाडी मारत वर्चस्व राखले. मात्र चुरशीच्या लढाईत विशाल बनकर याने १३ – १० अशा फरकाने चपळ चित्ता सिकंदर शेख याच्यावर विजय मिळवला.

Back to top button