Latest

Pune News : ‘त्या’ दोन मुलांचेही मृतदेह सापडले

अमृता चौगुले

नानगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दौंंड तालुक्यात हातवळण येथील भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी तीन मुले नदीत बुडाल्याची घटना शनिवारी (दि. ७) दुपारच्या सुमारास घडली. यावेळी स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी शोध सुरु केला. यावेळी एका मुलाचा मृतदेह मिळाला होता, मात्र दोघांचा तपास लागला नव्हता.

रविवारी (दि. ८) सकाळपासूनच पाटस पोलीस व ग्रामस्थ यांनी शोधमोहीम सुरु केली. सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास नदीत दोन्ही मुलांचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. नदीकाठच्या सध्या होडीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी पाटस पोलिसचे सहायक पोलिस निरीक्षक संजय नागरगोजे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT