लुधियाना : पुढारी वृत्तसेवा
पंजाबमधील लुधियाया येथील न्यायालयात आज सकाळी स्फाेट झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. न्यायालयाच्या तिसर्या मजल्यावर झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले असून, चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सिलिंडरमुळे हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
न्यायालयाच्या इमारतीमधील तिसर्या मजल्यावरील स्वच्छतागृहात स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की, न्यायालयाची संपूर्ण इमारतच हादरली. या मजल्यावरील खिडक्याही फुटल्या. यामुळे पार्किंगमधील वाहनांचे नुकसान झाले. या घटनेने न्यायालयात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बॉम्ब शोधपथक, पोलिसांसह जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांनी धाव घेतली.
स्फाेटानंतर शहरात हायअलर्ट जारी केला असून नाकाबंदी करण्यात आली आहे. आज लुधियाना शहरात मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची सभा होणार आहे. यापूर्वी झालेल्या स्फोटाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचलं का?