Latest

Blackbuck poachers : मध्‍य प्रदेशमध्‍ये शिकार्‍यांच्‍या अंदाधूंद गोळीबारात तीन पोलीस कर्मचारी ठार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

मध्‍य प्रदेशमध्‍ये शिकार्‍यांच्‍या टोळीने केलेल्‍या अंदाधूंद गोळीबारात तीन पोलिस कर्मचारी ठार झाले. ही धक्‍कादायक घटना मध्‍य प्रदेश राज्‍यातील गुना जिल्‍ह्यात घडली. दरम्‍यान, या प्रकरणाची गंभीर दखल मुख्‍यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतली आहे. त्‍यांनी आपल्‍या निवासस्‍थानी आज सकाळी उच्‍चस्‍तरीय बैठक घेतली. ( Blackbuck poachers )

Blackbuck poachers : मृतदेहावर तब्‍बल १२ ते १५ गोळ्या!

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुना जिल्‍ह्यातील आरोन परिसरातील जंगलात काळ्या हरणांची शिकार करणारी टोळीच्‍या शोधासाठी पोलिस गेले होते. यावेळी शिकार्‍यांनी त्‍यांच्‍यावर अंदाधूंद गोळीबार केला. यामध्‍ये एसआय राजकुमार जाटव, पोलिस कर्मचारी नीरज भार्गव आणि संतराम हे ठार झाले. त्‍यांच्‍या मृतदेहावर तब्‍बल १२ ते १५ गोळ्या आढळल्‍या असल्‍याची घटनास्‍थळी चर्चा हाेती. पोलिसांनीही शिकार्‍यांना चोख प्रत्‍युत्तर दिले. मात्र या घटनेबाबत अद्‍याप पोलिसांनी माहिती दिलेले नाही.

या घटनेची गंभीर दखल मुख्‍यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी घेतली आहे. त्‍यांनी आपल्‍या निवासस्‍थानी आज सकाळी
उच्‍चस्‍तरीय बैठक घेतली. यावेळी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, मुख्‍य सचिव इक्‍बाल सिंह बैस, डीजीपी बैठकला उपस्‍थित हाेते. गुना येथील वरिष्‍ठ अधिकारी व्‍हीसीच्‍या माध्‍यमातून बैठकीत सहभागी झाल्‍या.

पाेलिसांच्‍या कुटुंबीयांना प्रत्‍येकी एक काेटी

मुख्‍यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज सकाळी याप्रकरणी उच्‍चस्‍तरीय बैठक घेतली. यानंतर त्‍यांनी कर्तव्‍य बजावत असताना वीरमरण झालेल्‍या पोलिसांच्‍या कुटुंबीयांना प्रत्‍येकी एक कोटी रुपये व सरकारी नोकरी देणार असल्‍याचे त्‍यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांवर हल्‍ला करणारे गुन्‍हेगारांना कठोर कारवाई केली जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT