पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील भाषणावर भाजपने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. जेव्हा तुम्ही 'मोहब्बत' या विषयावर बोलता तेव्हा यामध्ये शिखांच्या हत्येचा समावेश होतो का? राजस्थानमधील महिलांच्या अपहरणाचा (BJP Vs Rahul Gandhi) समावेश होतो का? असे सवाल करत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हल्लाबाेल केला.
हे कसले प्रेम आहे जे आपल्या देशावर नाही तर, स्वत:च्या राजकीय राजकारणासाठी आहे. हे कसले प्रेम आहे जे कोळसा लुटेल आणि चारा लुटणाऱ्यांशी हातमिळवणी करेल. सिंगोलचा अपमान करेल, स्वत:च्याच संसदेचा बहिष्कार टाकते. भारताच्या राजधानीतच भारताचे तुकडे होवोत, असे बोलणाऱ्यांचे हे कसले प्रेम आहे? असे सवाल स्मृती इराणी यांनी केले.
विदेश दौऱ्यादरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्याचा आज ( दि.८ ) परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर ( S Jaishankar ) यांनी खरपुस समाचार घेतला. देशातील राजकारणावर विदेशात भाष्य करणे देशहिताचे नाही,असा सल्ला देखील परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गत ९ वर्षातील केंद्राच्या परराष्ट्र धोरणासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी विविध मुद्दयांवर भूमिका स्पष्ट केली.