

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग दर्शवणारी रॅली काढण्यात आली. कॅनडातील या घटनेचा निषेध करत काँग्रेसने आज (दि.८) सांगितले की, भारत सरकारने हा मुद्दा कॅनडासमोर जोरदारपणे उचलला पाहिजे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनाही विनंती केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रॅम्प्टन, कॅनडात खलिस्तान समर्थकांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्रण करणारी एक रॅली काढली आहे. (Indira Gandhi)
रॅलीचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ट्विट केले आहे की, "एक भारतीय म्हणून, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्रण करणारी कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे पाच किलोमीटर लांब परेड पाहून मला खूप वेदना झाल्या. ही एक बाजू घेण्याची बाब नाही, पण देशाच्या इतिहासाबद्दल आदराची बाब आणि माजी पंतप्रधानांच्या हत्येमुळे झालेल्या वेदना आहेत." पुढे बोलताना ते असेही म्हणाले की,"अतिवादाचा सार्वत्रिक निषेध केला पाहिजे आणि एकत्रितपणे सामना केला पाहिजे." देवरा यांच्या ट्विटला रिट्विट करत जयराम रमेश म्हणाले, "मी पूर्णपणे सहमत आहे. हे घृणास्पद आहे. जयशंकर म्हणाले की, हा मुद्दा कॅनडासमोर जोरदारपणे उचलला गेला पाहिजे.