Latest

Gujarat rebel leaders : भाजपने केले १२ बंडखोर नेत्‍यांना निलंबित

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. अशातच तिकिट नाकारलेले बंडखोर नेते भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहेत. नुकतेच सात नेत्‍यांना पक्षाने निलंबित केले होते. ( Gujarat rebel leaders )  आता आणखी १२ बंडखोर नेत्‍यांना निलंबित करण्‍यात आले असून, हे सर्वजण अपक्ष म्‍हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

५ डिसेंबर विधानसभा निवडणुकीच्‍या दुसर्‍या टप्‍प्‍यातील मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्‍ये सर्व बंडखोर नेत्‍यांनी भाजप उमेदवारांविरुद्‍ध अर्ज दाखल केले आहेत. शिस्‍तभंगाची कारवाई म्‍हणून १२ जणांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे, अशी माहिती गुजरात भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष सी.आर. पाटील यांनी दिली.

निलंबित केलेल्‍या नेत्‍यांमध्‍ये माजी आमदार दिनू पटेल, माजी आमदार धवलसिंह झाल, कुलदीपसिंह राऊळ, खातुभाई पागी, एसएम खांत ,जे. पी पटेल, रमेश झाला, अमरशी झाला, रामसिंह ठाकोर, मावजी देसाई आणि लेबजी ठाकोर यांचा समावेश आहे. गुजरात  विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी ८९ जागांसाठी १ डिसेंबरला तर उर्वरित ९३ जागांवर ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT