Latest

लोकसभा निवडणूक : भाजपने केली १९५ उमेदवारांची घोषणा, जाणून घ्‍या यादीतील ठळक वैशिष्ट्ये

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय जनता पक्षाने आज ( दि.२ मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. १९५ जणांची नावे असणार्‍या या यादीत १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचीही नावे आहेत. याशिवाय दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्येलाही लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. ( BJP releases first list of 195 candidates for Lok Sabha elections )

पहिल्‍या यादीतील ठळक वैशिष्ट्ये

  • १९५ उमेदवारांच्‍या नावांची घोषणा
  • ३४ केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांच्‍या नावांचा समावेश
  • 28 महिलांना संधी
  • ५० पेक्षा कमी वय असलेले उमेदवार ४७
  • अनुसूचित जातीतील 27 उमेदवार
  • अनुसूचित प्रवर्गातील 18 उमेदवार
  • इतर मागास प्रवर्गातील 57 नावे

राज्यानिहाय जाहीर झालेले उमेदवार, कंसात उमेदवारांची संख्‍या

उत्तर प्रदेश ( 51), पश्चिम बंगाल ( 26), मध्य प्रदेश ( 24), गुजरात (15), राजस्थान (15), केरळ (12), तेलंगणा (9), आसाम (11), झारखंड (11), छत्तीसगड (11), दिल्ली ( 11), जम्मू-काश्मीर (5), उत्तराखंड (3) अरुणाचल, गोवा, त्रिपुरा, अंदमान-निकोबार आणि दमण आणि दीवमधील प्रत्येकी एक.

पहिल्‍या यादीतील दिग्‍गज उमेदवार

वाराणसी – नरेंद्र मोदी, गांधीनगर- अमित शहा, विदिशा – शिवराजसिंह चौहान,अमेठी – स्मृती इराणी, लखनौ- राजनाथसिंह, गुना – ज्योतिरादित्य शिंदे, कोटा – ओम बिर्ला, जौनपूर – कृपाशंकरसिंह, मथुरा – हेमामालिनी, उनाव – साक्षी महाराज, उत्तर गोवा – श्रीपाद नाईक, नवसारी – सी. आर. पाटील, चितोडगड – सी.पी.जोशी, जम्मू – काश्मीर – जितेंद्र सिंग, अलवर – भुपेंद्र यादव,

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT