Latest

BJP on Jitendra Awhad| प्रभू राम यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभू श्री राम शाकाहारी नव्हते, तर मांसाहारी असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. या प्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात भाजपने तक्रार दाखल केली आहे. भाजप नेते राम कदम यांनी आव्हाड यांच्या विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात  तक्रार दाखल केली आहे. याचे पडसाद राज्यभर उमटत असून, आव्हाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (BJP on Jitendra Awhad)

नेमकं जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? 

 "भगवान श्री राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. १४ वर्षांपासून जंगलात राहणारा माणूस शाकाहारी अन्न शोधायला कुठे जाणार? बरोबर आहे की नाही?" असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. शिर्डी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. (BJP on Jitendra Awhad)

आव्हाडांच्या वक्तव्यावर मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रतिक्रिया

"राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड जे बोलत आहेत ते पूर्णपणे खोटे आहे. आपल्या धर्मग्रंथात कुठेही असे लिहिलेले नाही. प्रभू राम वनवासात शाकाहारी जेवण करायचे, ते फळे खायचे असे लिहिले आहे. आव्हाड सारख्या लबाड माणसाला आपल्या प्रभू रामाचा अपमान करण्याचा अधिकार नाही. आमचा देव नेहमीच शाकाहारी होता. आपल्या प्रभू रामाचा अपमान करण्यासाठी असे अपमानास्पद शब्द बोलले जात आहेत." (BJP on Jitendra Awhad)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT