Latest

…तर कागल तालुक्यात भगवा फडकेल: समरजितसिंह घाटगे

अनुराधा कोरवी

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : आज आपण कुस्तीसाठी एकत्र जमलो आहोत, तसे राजकीय फायद्यासाठी सुध्दा एकत्र जमणे गरजचे आहे. जर आपण एकत्र राहिलो तर कागल तालुक्यामध्ये सर्वत्र भगवा फडकेल. तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी होतील. असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. मुरगुड येथे कुस्तीच्या आखाड्यात समरजितसिंह घाटगे, वीरेंद्र मंडलिक, रणजीतसिंह पाटील हजारो कुस्तीशौकीनांसमोर यांनी केलेल्या राजकीय कोट्यामुळे अखेर राजकीय दंगल घडल्याचे स्पष्ट झाले.

यावेळी मंडलिक साखर कारखान्याचे संचालक विरेंद्र मंडलिक म्हणाले की, गेली अनेक वर्षे मुरगुडने 'गोकुळ'मध्ये प्रतिनिधित्व केले, पण यावेळी संधी हुकली. दादा, आपण जर दोघांनी एक -एक मत एकमेकांकडे मागितले असते तर वेगळेच घडले असते, पण आम्ही तसे केले नाही. मुरगूड नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात सर्वसाधारणपणे ५० कोटीची विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आगामी नगरपालिका निवडणूक संदर्भात आमचे सर्व पर्याय खुले आहेत.

'गोकुळ' दुध संघाचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यावेळी म्हणाले, भविष्यातील आपल्या गटाच्या राजकारणासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. माझी माणसे कुठेही गेली नसून ती आपल्याबरोबर आहेत. अनेकांच्या हातांना काम द्यायचं भाग्य मला लाभले. अनेक अनाथांना दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक कार्य हे पूर्ण केले. इथून पुढे आपण अशाच पध्दतीचे समाजकार्य करणार आहे.

यावेळी अमरसिंह घोरपडे, एम. पी. पाटील, अर्जुन आबिटकर, नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय खराडे, अनंत फर्नांडीस, विश्वजीत पाटील, पद्मसिंह पाटील, संतोष वंडकर, बजरंग सोनुले, सचिन मगदूम, विक्रम जाधव, पृथ्वीराज कदम, युवराज सूर्यवंशी, युवराज पाटील, दत्तात्रय जाधव, बाजीराव चांदेकर, सुनील कापसे, भरत लाड, सुरेश भिके, रमेश परीट, चंद्रकांत कुंभार, कुमार सावर्डेकर, सुनील चव्हाण, मुकुंद खंडागळे आदी मान्यवर हजर होते.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT