Latest

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकमधील पराभरावनंतर भाजप सतर्क; अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्व ताकद झोकून देखील कर्नाटकमधील (Karnataka Election Results 2023) पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. मुस्लिम मतदारांनी भाजप-जेडी(एस) ला बाजूला सारत काँग्रेसला दिलेल्या पसंतीमुळे दक्षिणेतील एकमेव राज्यात असलेली सत्ता पक्षाला गमवावी लागली. भाजपने आता हा पराभव अत्यंत गांभीर्याने घेतला असून आगामी काळात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत याचा प्रभाव पडू नये, याची खबरदारी घेतली आहे. या अनुषंगाने देशभरातील अल्पसंख्यांक मोर्चाच्या सर्व प्रदेश मीडिया संयोजक तसेच सह संयोजकांची बैठक आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

पक्षाच्या मुख्यालयात आयोजित या बैठकीतून कार्यकर्त्यांना (Karnataka Election Results 2023) बौद्धिक धडे दिले जातील, अशी माहिती समोर आली आहे. अल्पसंख्यकांचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये पक्ष तसेच सरकारच्या धोरणांच्या प्रभावासंबंधी देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचे कळतेय. यासोबतच अल्पसंख्यांक समाजात भाजपचे धोरण कशा पद्धतीने मांडता येईल, यासंदर्भात देखील चर्चा केली जाईल. धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी, आर. पी. सिंह, सुधांशु त्रिवेदी, शहजाद पूनावाला वेगवेगळ्या सत्रातून मार्गदर्शन करतील.

यासोबतच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय देखील एका सत्राला संबोधित करणार असल्याचे कळतेय. कर्नाटक पाठोपाठ आता मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चांने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. अल्पसंख्यांक मतदारांचा प्रभाव असलेल्या भागामध्ये बूथ पातळीवर मोर्चा सक्रिय झाला आहे. मिशन स्वरुपात राबवण्यात येणाऱ्या अभियानातून अल्पसंख्यांक समाजाचे मत पक्षाकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. याअनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे कळतेय.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT