Latest

Bipasha Basu Pregnancy : बिपाशाच्या डोहाळे जेवणात पंच-पकवान (VIDEO)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई होणार आहे. बिपाशाने तिचा पती करण सिंह ग्रोवरसोबत  फोटोशूट करून याबाबतची गुडन्यूज दिली होती.  (Bipasha Basu Pregnancy ) नुकतेच बिपाशाच्या आईच्या घरी डोहाळे जेवणाचा क्रार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे काही फोटो आणि एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याचसोबत बिपाशा मुंबईतील एका पार्लरच्या बाहेरदेखील स्पॉट झाली होती. यावेळी तिच्या या फोटोवर चाहत्यांनी 'आलिया भट्टची कॉफी केलीय' म्हणत कॉमेन्टचा पाऊस पडत आहे.

अभिनेत्री बिपाशा बसूचे नुकतेच पारंपरिक बंगाली पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला . हा कार्यक्रम बिपाशाच्या आईच्या घरी आयोजित करण्यात आलाय. यावेळचे काही फोटो आणि व्हिडिओ बिपाशाने स्वत: च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यावेळी बिपाशाची आई आरतीचे ताट घेवून तिचे औक्षण करताना दिसतेय. याशिवाय शेअर झालेल्या व्हिडिओत बिपाशा पंच्चपक्कवानाच्या ताटावर ताव मारताना दिसतेय. तर तिच्या आईने प्रेमाने तिला घास भरवताना दिसतेय.

यातील खास म्हणजे, यावेळी बिपाशाने गुलाबी रंगाच्या बनारसी साडीसोबत सोन्याचे दागिने परिधान केली आहेत. यात तिच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद ओसंडून वाहत आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने 'All dressed up for some loving and eating ❤️', '…Babies ❤️??', 'Wish to be a Ma like you ❤️,Love you Ma ❤️? ', 'Aamaar Shaadh❤️? Thank you Ma ❤️?'. लिहिली आहे. यावेळी बिपाशासोबत पती करण सिंह ग्रोवर, आई आणि इतर नातेवाईक आनंदीत दिसत आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'तुम्ही खूप सुंदर दिसत आहात', 'खूप सुंदर! देव तुला, करण आणि तुझ्या मुलाला आशीर्वाद देवो'. असे म्हटलं आहे. याआधी एक दिवस बिपाशा मुंबईतील एका पार्लरच्या दुकानाबाहेर स्पॉट झाली होती. यावेळी तिने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसारख्या ढिल्या कपड्याची कॉफी केल्याचे म्हटलं गेलं आहे. बिपाशाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे. (Bipasha Basu Pregnancy )

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT