Latest

Bipasha Basu-Karan : बिपाशाकडून खास फोटो शेअर, करणवर केला प्रेमाचा वर्षाव

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिपाशा बसू (Bipasha Basu-Karan) आणि करण सिंह ग्रोवर यांनी एक क्यूट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. बिपाशाने हातावर मेहंदी काढलीय आणि फ्लॉवर ज्वेलरी परिधान केली आहे. करण आणि बिपाशा यांचा हा रोमँटिक फोटो आहे. या फोटोमध्ये दोघेही हसताना दिसताहेत. बिपाशाने हा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिलीय-Always My Numbet 1 ❤️. My Person ❤️. #monkeylove #newparents. या फोटोवर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी कमेंट्स दिल्या असून हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. अभिनेत्री शमिता शेट्टीने दोन हार्ट इमोजी ❤️❤️ शेअर केल्या आहेत. (Bipasha Basu-Karan)

बिपाशा बसूने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी कमेंट्समध्ये काय म्हटलंय पहा-

Awwwwwwww, Prince and Princess ❤️❤️, ?? ????, Absolute love and happyness?❤️?, Love you both di ❤️, Congratulations and lol for both of you ?, It's sooo cuteeeee, Love ittt??, Each other's forever people ?.

बिपाशा आणि करण यांनी २०१६ रोजी विवाहबंधनात अडकले होते. २०२२ मध्ये बिपाशाने नन्ही परीला जन्म दिलाय. बिपाशा आणि करणने तिचं नावदेवी असं ठेवलं आहे.

याआधी बिपाशाने आपल्या लेकीची फर्स्ट झलक सोशल मीडियावर दाखवली होती. बिपाशाने १२ नोव्हेंबर रोजी देवीला जन्म दिला होता. बिपाशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये बिपाशा-करण खिडकीजवळ उभे आहेत. करणने आपल्या बाळाचा हात धरल्याचे दिसले होते. तर बिपाशा आपल्या बाळाला न्याहाळताना दिसत होती.नन्ही परीचा फोटो शेअर करत बिपाशाने लिहिलं होतं-'स्वीट बेबी एंजल बनवण्याची रेसिपी.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT