Latest

Bihar Murder : बिहारमध्ये पतीने तीन मुलींसह पत्नीची गळा चिरून केली हत्या

अमृता चौगुले

पाटणा; वृत्तसंस्था : मुन्ना यादव (वय 40) या एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी घरी आला आणि त्याचा पत्नी पूजा (32) हिच्याशी वाद झाला. संतापच्या भरात मुन्नाने चाकू काढला आणि पूजाचा गळा चिरला. नंतर एकापाठोपाठ स्वत:च्या तिन्ही मुलींवर वार केले. (Bihar Murder)

दोन्ही मुलांच्या डोळ्यादेखत खगडिया जिल्ह्यातील मानसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकनिया गावात हा थरार घडला. एका मुलाने बेफाम पित्याला आवर घालण्याचा आपल्या परीने प्रयत्नही केला, पण पित्याने त्याच्यावरही चाकू उगारला. मुलगा तेथून पळत सुटला. दुसरा मुलगाही यावेळी गच्चीवर होता. तोही पळाला. सुमन (वय 18), आंचल (16), रोशनी (15) अशी मृत मुलींची नावे आहेत. चौघींची हत्या केल्यानंतर मुन्ना खाली उतरला आणि आवारातील झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. नंतर एका मुलाने पोलिसांसमोर हा सारा थरार उभा केला. तो म्हणाला. आम्ही भावंडं गच्चीवर खेळत होतो. वडिलांनी खाली खोलीत आईला आणि मोठ्या बहिणीला मारले. नंतर ते वर आले. एका बहिणीच्या डोक्यात मारले, दुसरीची मान उडवली. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते माझ्यावर धावून आले. चाकू दाखविला. आम्ही दोघे भाऊ मग पळून गेलो. (Bihar Murder)

मुन्ना व पूजाचे भांडण यावरून…

मुन्ना यादव याने ऑक्टोबर 2022 मध्ये लगतच्या रहिमपुरात गोळ्या झाडून एका पाटिदाराचा खून केला होता. तेव्हापासून मुन्ना फरार होता. तो क्वचित घरी येत असे. पत्नी पूजा त्याला पोलिसांसमोर हजर होण्यास सांगत असे. यावरून दोघांत वाद होत, असे गावकर्‍यांनी सांगितले.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT