Latest

shalin bhanot : बिग बॉसने घेतली शालिनची शाळा, आता घरातून बाहेर पडायचेय शालिनला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस -१६ शो चा आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला. यामध्य़े शालिन भनोट (shalin bhanot ) कॉन्फ्रेंस रूममध्ये दिसला आणि बिग बॉस त्याची शाळा घेताना दिसले. त्यानंतर शालिन रागाच्या भरात बोलताना दिसला. शालिन म्हणतो की, 'या घरात माझ्याशी बोलणारे कुणी नाही.' (shalin bhanot )

बिग बॉसचा १६ व्या सीझनची खूप चर्चा झाली आहे. या शोमध्ये सर्व स्पर्धक आपल्या वक्तव्यामुळे आणि घरामध्ये एकमेकांसोबत भांडणामुळे चर्चेत आहेत. बिग बॉस १६ फिनालेकडे वळत आहेत. प्रत्येक स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. या सर्वांदरम्यान, स्पर्धक आपले गेम खेळताना दिसत आहेत. कलर्स टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे.

शालिन म्हणाला हे घर खायला उठतं…मला बाहेर पडायचं आहे

बिग बॉस १६ च्या आगामी एपिसोडमध्ये शालिन कॉन्फ्रेंस रूममध्ये दिसला. तेथे बिग बॉस शालिनला खूप काही ऐकवले. नंतर शालिनला राग येतो. शालिनने बिग बॉसला विचारले की, काय हा कॅमेरा साऊंड प्रूफ आहे. ज्यावर बिग बॉस म्हणाले की, हो हे साउंडप्रूफ आहे. यानंतर शालिन रागाच्या भरात खूप काही म्हणताना दिसला. शालिन म्हणाला की, माझ्यासोबत कुणी बोलणारे नाही या घरामध्ये, हे घर खायला उठतं. मला येथून बाहेर पडायचे आहे.

शालिन-टीना यांच्यात जोरदार भांडण

शालिन मागील एपिसोडमध्ये प्रियंका आणि टीनाची साथ सोडून एका वेगळ्या ग्रुपमध्ये दिसतात. शालिन निमृत सोबत राहून तिला आपल्या सोबत घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मागील एपिसोडमध्ये शालिन आणि टीना भांडण करताना दिसतात. दोघे एकमेकांवर आरोप करताना दिसतात. स्पर्धकांविषयी सांगायचं झालं तर सर्वजण आपल्या हिशोबाने खेळताने दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT