Latest

बिग बॉस मराठी सिझन चौथा Day 7 : योगेशला जेलच्या बाहेर काढले जाईल का?…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज योगेश असणार आहे जेलमध्ये. आणि त्यासाठी अपूर्वा हात जोडून मेघा घाडगे समोर विनवणी करताना दिसणार आहे. यावेळी अपूर्वा त्याच्याकडून नकळत घडले असल्याचे बोलत आहे.

यावेळी अपुर्वा बिग बॉस घरात तुम्ही असं निर्दयी होऊ नका. योगेशराव तुम्ही गप्प बसा की, मी तुमच्यासाठी बोलते आहे. यावर मेघाने विचारले तुम्ही कोण त्यांच्या?. त्यावर योगेश म्हणाला, माझ्या क्रश … ! मेघा ताई म्हणाली, "परत इंग्रजी शब्द वापरला, आता तुम्हीचं बोला.. अपूर्वा म्हणाली, मी पुन्हा एकदा योगेशसाठी विनवणी करते. आता जर तू बोलास पुन्हा तर खवटा घालेन गप बस…" असेही ती म्हणाली आहे.

मेघा घाडगे अपूर्वाच्या विनवणीचा मान राखून योगेशला जेलच्या बाहेर काढतील? की, त्याची शिक्षा अजून वाढेल बघूया आजच्या भागामध्ये.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT