Latest

 Bigg Boss 16 Winner : पुण्याचा एमसी स्टॅन ठरला बिग बॉसचा विजेता, तर शिव ठाकरे उपविजेता

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीचा चर्चित रिॲलिटी शो बिग बॉसचा (Bigg Boss 16 Winner) विजेता पुण्याचा एमसी स्टॅन (MC Stan) ठरला आहे. तर शिव ठाकरे उपविजेता ठरला आहे. टाॅप 5 मध्ये शिव उर्फ एमसी स्टॅन, अर्चना गाैतम, प्रियंका चाैधरी, शिव ठाकरे आणि शालिन भनोट हे होते. या पाचजणांमध्ये चुरस होती. अखेर बिग बॉसच्या ट्रॉफीवर शिव उर्फ एमसी स्टॅनने आपली मोहर उमटवली.

 Bigg Boss 16 Winner : एमसी स्टॅन (MC Stan)

लोकप्रिय असलेल्या 'बिग बॉस' हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विनर कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागुन राहीले होते. रविवारी (१२ फेब्रुवारी) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. सलमान खानने 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन केले.  एमसी स्टॅन, अर्चना गाैतम, प्रियंका चाैधरी,  शिव ठाकरे, आणि शालिन भनोट या पाचजणांमध्ये चुरस होती. टॉप २ मध्ये शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन होते. आणि एकदाची घोषणा झाली आणि पुण्याचा  एमसी स्टॅन (MC Stan) हा  'बिग बॉस' हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विनर ठरला. त्याला 'बिग बॉस'ची ट्रॉफी आणि ३१ लाख ८० हजार ही रक्कम मिळाली.

कोण आहे एमसी स्टॅन (MC Stan)

पुण्याचा असलेला 23 वर्षीय एमसी स्टॅन (MC Stan) याच खरं नाव हे अल्ताफ शेख (Altaf Shaikh) आहे. एमसी स्टॅनला लहानपणापासूनचं संगिताची आवड होती. त्याच्या 'वाता' या गाण्याने त्याला एक ओळख दिली. त्याने 12 व्या वर्षी कव्वालीच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT